*मनपा मिशन 40 साठी झटणार महाआघाडी*

0
3
Mes logo
 belgaum

बेळगाव शहरावर लोकमत दाखवण्यासाठी मराठी माणसाचे अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी मनपावर मराठी माणसाची सत्ता टिकवण्याची गरज आहे यासाठी मनपात 40 मराठी भाषिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी कार्य सुरू करू असा निर्धार मराठी भाषिक महा आघाडीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

अजुन पर्यंत आघाडीची रीतसर स्थापना झाली नाही. कारण लोकसभा निवडणुकीत आपण एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी का? यासाठी गेल्या पाच मीटिंग मध्ये चर्चा झाली.
आणि शेवटी निवडणूक लढण्याचे ठरले. याची सुरुवात तिसऱ्या बैठकीत झाली, दत्ता जाधव यांनी ही एक निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची या भूमिकेवर ठाम राहिले. आणि मग मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून शुभम शेळके यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते.

आगामी काही महिन्यात होऊ घातलेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकित तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला बळ देण्यासाठी प्रयत्न करू असेही ठरवण्यात आले.रविवारी सायंकाळी कोंडुस्कर भवन येथे मराठी भाषिक महाआघाडीची बैठक झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील होते.मागील लोकसभा निवडणुकीत लोकसभेत मिळालेला मराठी भाषिकांचा भरभराट यश, आगामी तालुका पंचायत जिल्हा पंचायत आणि महानगरपालिका मराठी भाषिकांचे वर्चस्व टिकवण्यासाठी मराठी भाषिक महाआघाडी कार्यरत राहणार आहे.Mes logo

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समिती ही सर्वश्रेष्ठ आहेच पण त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षात विखुरलेल्या मराठी भाषिकांची घरवापसी करून मराठी भाषिक महाआघाडी च्या माध्यमातून एकजुट करण्याचा निर्धार झाला.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार सर्वप्रथम महाआघाडीच्या बैठकीत दत्ता जाधव यांनी व्यक्त केला होता त्याच पद्धतींने बेळगाव मनपावर 40 नगरसेवक निवडून आणूया असा विश्वास दत्ता जाधव यांनी यावेळी मांडला.
प्रास्ताविक करताना सागर पाटील म्हणाले की नजीकच्या काळात तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत तेव्हां आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. माजी नगरसेवक रणजित चव्हाण यांनी की या सर्व निवडणुकीत जे इच्छुक नाहीत अशांची मोट बांधून कार्याला वाहून घेतले पाहिजे असे सुचवले तर
रमाकांत कोंडूसकर यांनी आपण मराठा समाज एकत्र यावा यासाठी म्हणून केंव्हाही एक पाऊल मागे घेईन कार्य करण्याचे आश्वासन दिले.
अभिजित मजुकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की इथूनच आघाडीच्या कार्याला सुरुवात झाली आहे आणि पुढेही आपण असच कार्याला वाहून घेऊन काम करूया.महादेव पाटील यांनी आघाडीची रीतसर स्थापना का झाली पाहिजे याचं विस्तृत विवेचन केले.
यावेळी संजय सातेरी संजय कडोलकर सुनील बोकडे,बंडू केरवाडकर अभिजीत मजूकर कपिल भोसले अहमद रेशमी विनायक हुलजीआदी उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.