Wednesday, May 15, 2024

/

पंधराशे रुपयासाठी भांडणात धाबा चालकाचा खून

 belgaum

पैश्याच्या व्यवहारातून दोघांत चाललेल भांडण मिटवायला धाबा मालकावर हल्ला करून त्याचा खून केल्याची बेळगाव जवळील एम के हुबळी येथे घडली आहे.

झगडा सोडवायला गेलेल्यावर हल्ला होताच उपचारासाठी इस्पितळात दाखल करायच्या अगोदर त्या इसमाचा मृत्यू झाला आहे.बेळगाव जिल्ह्यातील कित्तुर तालुक्यातील एम के हुबळी येथे ही घटना घडली आहे.

एम के हुबळी येथील पंचवटी धाब्याचे मालक प्रकाश नागणुर वय 38 असे मयत झालेल्या धाबा मालकाचे नाव आहे.रविवारी सायंकाळी झालेल्या मारामारीचे रूपांतर खुनात झाले आहे.

 belgaum

पंधराशे रुपये पैश्याच्या व्यवहारातून युवकांचा एक गट पैश्यांची विचारणा करण्यासाठी धाब्यावर गेला होता त्यावेळी हे भांडण घडले होते.युवकांच्या गटाने धाबा मालकांवर हल्ला केल्याने तो जखमी झाला होता त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करताना त्याचा मृत्यू झाला आहे.Murder mk hubli

दोन्ही गटात वादावादी झाल्या नंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले त्यावेळी वाद सोडवायला गेलेल्या प्रकाश नागणुर वर प्राणघातक हल्ला झाला त्यात त्याचा अंत झाला आहे.

कित्तुर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे पोलीस अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.