belgaum

संतप्त ग्रामस्थांनी अडवली बस!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : यळेबैलमध्ये परीक्षेच्या काळातच एसटी बस न थांबवता निघून जाणाऱ्या चालक आणि वाहकाला संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यातच बस रोखून चांगलेच फैलावर घेतले.

यळेबैल गावात बस चालक आणि वाहकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या परीक्षा सुरू असतानाच ठरलेल्या थांब्यावर बस न थांबवता ती पुढे पळवून नेली जात आहे. या मनमानी कारभारामुळे ऐन वेळेवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे अशक्य बनले असून, त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

सततच्या या त्रासाला कंटाळून अखेर आज ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यळेबैल येथे येणारी बस अडवून उपस्थितांनी चालक आणि वाहकाला जाब विचारत चांगलेच फैलावर घेतले.

 belgaum

परीक्षेच्या दिवसांत मुद्दाम बस न थांबवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ का केला जातोय, असा थेट सवाल करत नागरिकांनी कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

परिवहन मंडळाच्या या निष्काळजीपणामुळे यळेबैल परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. याप्रकरणी वायव्य वाहतूक महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.