belgaum
0
 belgaum

होमिओपॅथीने बहिरेपणावर उपचार शक्य: डॉ.सरनोबत

बेळगाव लाईव्ह : ऐकण्याची क्षमता कमी होणे किंवा बहिरेपणा ही गंभीर आरोग्य समस्या आहे. मात्र, योग्य निदान आणि वेळेवर उपचार केल्यास काही प्रकारच्या श्रवणविषयक समस्यांवर उपचार करणे शक्य असल्याची माहिती ‘ल्युशा कॉस्मेटॉलॉजी’च्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली.

बेळगाव लाईव्ह च्या हेल्थ टिप्स या साप्ताहिक कार्यक्रम बोलताना त्यांनीही माहिती दिलीबहिरेपणाचे विविध प्रकार असून त्यामागची कारणे समजून घेणे आणि त्यानुसार उपचार करणे महत्त्वाचे आहे.

बहिरेपणाचे दोन प्रमुख प्रकार

कन्डक्टिव्ह डेफनेस (Conductive Deafness) :
कानाची रचना किंवा कानातील सूक्ष्म हाडांमध्ये विकार निर्माण झाल्यास हा प्रकार उद्भवतो. वारंवार होणारे कानाचे संसर्ग, कानाला झालेली दुखापत किंवा कानातील सूक्ष्म हाडांमध्ये होणारे बदल ही त्याची प्रमुख कारणे आहेत. कानातील संतुलन राखणाऱ्या यंत्रणेमुळे कानाला दुखापत झाल्यास किंवा कानात अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे किंवा गरगरणे यांसारखा त्रासही होऊ शकतो.

 belgaum

न्यूरोजेनिक/सेन्सोरी डेफनेस (Neurogenic/Sensory Deafness) :
कानाकडून मेंदूकडे ध्वनीचे संदेश पोहोचविणाऱ्या श्रवण मज्जातंतूमध्ये बिघाड झाल्यास हा प्रकार होतो.

निदानानंतरच उपचार महत्त्वाचे

बहिरेपणा नेमका कोणत्या प्रकारचा आहे, हे निश्चित करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या मते, काही प्रकारच्या श्रवणविषयक समस्यांमध्ये होमिओपॅथीचा उपचार पर्याय म्हणून विचार केला जाऊ शकतो.

होमिओपॅथीमध्ये रुग्णाची शारीरिक प्रकृती, लक्षणे आणि आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ‘सिमिलीमम’ (Simillimum) तत्त्वानुसार औषधाची निवड केली जाते. आर्सेनिक अल्बम (Arsenicum Album), कॅल्केरिया कार्ब (Calcarea Carb), थूजा (Thuja) आणि सिफिलीनम (Syphilinum) यांसारख्या औषधांचा वापर रुग्णाच्या लक्षणांनुसार केला जाऊ शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक

कोणतीही औषधे स्वतःहून घेणे टाळावे. होमिओपॅथी उपचार घेताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य निदान आवश्यक आहे. चुकीचे औषध किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यास अपेक्षित फायदा न होण्याची शक्यता असते.

त्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानात आवाज येणे, वारंवार कान दुखणे किंवा चक्कर येणे यांसारखी लक्षणे जाणवल्यास विलंब न करता कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून (ENT) तपासणी करून घेणे आणि त्यानंतर योग्य उपचारपद्धतीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.