belgaum

खानापूरच्या दाम्पत्यावर सांगलीत हल्ला; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील मनीषा मोहन केसरेकर (वय 37) यांचा सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी (15 ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्याच्या कारणावरून मोहन केसरेकर आणि शेजारी राहणारे फरीद अब्दुल शेख (वय 52) यांच्यात वाद झाला. यावेळी शेख याने हातोडीने मोहन यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर मनीषा यांच्या पोटावर चाकूने वार केल्याची माहिती आहे.

गंभीर जखमी मनीषा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहन यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 belgaum

घटनेनंतर संशयित फरीद अब्दुल शेख पसार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे हेब्बाळसह खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, मनीषा यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.