belgaum

रेल्वेच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पी.बी. रोडजवळील तानाजी गल्ली ओव्हरब्रिज परिसरात आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत विद्यार्थ्याचे नाव रोहित रमेश पाटील, रा. कोंडस्कोप, बेळगाव, असे असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या खिशात आढळलेल्या बस पासवरून त्याची ओळख पटल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीम बेळगावचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, शशिकांत अंबेवाडकर, विकी मेहता, मायकेल पिंटो आणि शुभम हूळी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

 belgaum

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेतून हलविण्यात आला.

घटनेच्या वेळी रोहितच्या कानात इयरफोन असल्याची माहिती समोर आली आहे. इयरफोनमुळे रेल्वे येत असल्याचा आवाज त्याला ऐकू आला नाही का आणि त्यामुळेच हा अपघात झाला का, याबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत. अपघाताचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.११

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.