belgaum

ऑक्सोरकडून ‘एमएक्स कार्बन’ हेल्मेट लाँच

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वेगा ऑटोच्या प्रीमियम ‘ऑक्सोर’ ब्रँडने ‘एमएक्स CARBON’ हा जगातील सर्वात हलका ट्रिपल-सर्टिफाइड ऑफ-रोड हेल्मेट बाजारात आणला आहे.

सुमारे १०५० ग्रॅम वजन असलेल्या या हेल्मेटची निर्मिती बेळगाव येथील कारखान्यात करण्यात आली असून, याला ईसीई २२.०६, डॉट आणि आयएसआय ही प्रमुख सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

ऑफ-रोड रायडिंगदरम्यान सुरक्षेशी तडजोड न करता वजन कमी करण्याचे मोठे आव्हान कंपनीने लीलया पेलले आहे. कार्बन-फायबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून तयार करण्यात आलेले हे हेल्मेट लांबच्या आणि खडतर प्रवासात रायडर्सचा थकवा कमी करण्यास मदत करेल.

 belgaum

वेगा ऑटो कंपनीची १९९८ पासूनची कार्बन-फायबर आणि कंपोझिट इंजिनिअरिंगमधील प्रदीर्घ परंपरा या उत्पादनाच्या पाठीशी आहे.

कंपनीने नुकतीच आपल्या कंपोझिट मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढवण्यासाठी २ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. “एमएक्स कार्बन हे भारताच्या अत्याधुनिक उत्पादन क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे,” असे वेगा ऑटोचे अध्यक्ष दिलीप चंदक यांनी म्हटले.

तर, “सुरक्षेचे सर्व निकष पाळून वजन कमी करणे हे इंजिनिअरिंग समोरील मुख्य आव्हान होते आणि ते आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केले,” अशी प्रतिक्रिया व्यवस्थापकीय संचालक गिरधारी चांडक यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.