belgaum

ह.भ.प. शामराव गोपाळ पाटील यांचा ७५वा अमृतमहोत्सव;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : निलजी गावातील धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व तथा श्री राम सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळाचे सेक्रेटरी ह.भ.प. श्री. शामराव गोपाळ पाटील यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी निलजी येथे हा सोहळा विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. गावातील धार्मिक कार्यासह सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये शामराव पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. तसेच श्री यल्लम्मा मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सुमारे १५ वर्षे सांभाळली आहे.

पंढरपूरच्या वार्षिक दिंडी सोहळ्यातही गेल्या २२ वर्षांपासून ते सहनेतृत्वाची भूमिका बजावत आहेत. दिंडीतील वारकऱ्यांसाठी वैद्यकीय मदत, भोजन-साहित्य तसेच वाहतुकीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

 belgaum

अमृतमहोत्सवानिमित्त सकाळी ७ ते ९ या वेळेत रामदेव गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी गणहोम पूजा होणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत श्री विठ्ठल-रखुमाई पूजन होईल.

सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य पूर्णानंद काजवे महाराज, कोगनोळी यांचे कीर्तन-निरूपण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८.३० ते १० या वेळेत उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम गजानन मंगल कार्यालय, मेन रोड, निलजी येथे होणार आहे.

पाटील बंधू व परिवार, श्री राम भजनी मंडळ, श्री राम मंदिर ट्रस्ट, देवस्थान पंच कमिटी, मध्यवर्ती गजानन मंडळ, बेस्ट फ्रेंड ग्रुप तसेच पंचक्रोशीतील नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या वतीने नागरिकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.