belgaum

बेळगाव, हुबळी दिल्ली विमानसेवा दररोज पूर्ववत

0
IndiGo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आठवड्यातून तीन दिवस असलेली बेळगाव दिल्ली विमानसेवा आता 1 ऑक्टोबर पासून दररोज पुरवत होणार आहे. केवळ बेळगावच नव्हे तर हुबळी दिल्ली देखील विमानसेवा दररोज केली जाणार आहे.

उत्तर कर्नाटकातील हवाई संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा झाली आहे. हुबळी-धारवाड आणि बेळगाव शहरांतून दिल्लीला थेट विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी इंडिगो एअरलाईन्सने आनंदाची बातमी दिली आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून दिल्ली-हुबळी आणि दिल्ली-बेळगावदरम्यान दररोज थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

इंडिगोने या दोन्ही मार्गांवर दैनंदिन विमानसेवेची घोषणा केली आहे.
हुबळी-दिल्ली मार्गावर Flight No. 6E7588 हे विमान दिल्लीहून सायंकाळी ४.३० वाजता सुटून ६.५५ वाजता हुबळी येथे पोहोचेल. त्यानंतर Flight No. 6E2115 हे विमान हुबळीहून सायंकाळी ७.३० वाजता सुटून रात्री १०.०५ वाजता दिल्लीला पोहोचेल.

 belgaum


तर बेळगाव-दिल्ली मार्गावर Flight No. 6E2511 हे विमान दिल्लीहून सकाळी ६.१५ वाजता सुटून ८.४० वाजता बेळगावला पोहोचेल. Flight No. 6E2512 हे विमान बेळगावहून सकाळी ९.१० वाजता सुटून ११.४० वाजता दिल्लीला पोहोचणार आहे.


या थेट आणि दैनंदिन विमानसेवेमुळे उत्तर कर्नाटकातील व्यापार, उद्योग, रोजगार, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दिल्लीशी थेट हवाई संपर्क उपलब्ध झाल्याने बेळगाव आणि हुबळी परिसरातील प्रवाशांची कनेक्टिंग फ्लाइटवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.

बेळगाव मधून खानापूर विजापूर मिरज सांगली आणि कोल्हापूरचे प्रवासी देखील दिल्लीला जातेवेळी या विमानसेवेचा लाभ घेत असतात त्यामुळे दररोज विमानसेवा केल्याने आता या भागातील प्रवाशांना या चा लाभ होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.