belgaum

JOC धारकांच्या परवाना नूतनीकरणासाठी गुंजटकरांची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: सिव्हिल इंजिनिअर्स, जॉब ओरिएंटेड प्री-युनिव्हर्सिटी डिप्लोमा (JOC) आणि आर्किटेक्चर डिप्लोमा धारकांच्या परवान्यांचे नूतनीकरण पुन्हा सुरू करावे, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापालिका आयुक्त एम. जी. कार्तिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सन 1980 पासून बेळगाव महापालिकेकडून JOC आणि आर्किटेक्चर डिप्लोमा धारकांना परवाने देऊन वेळोवेळी त्यांचे नूतनीकरण केले जात होते. मात्र, अलीकडे JOC डिप्लोमा धारकांच्या परवान्यांचे नूतनीकरण बंद करण्यात आल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बेळगावमध्ये सुमारे 400 हून अधिक JOC डिप्लोमा धारक असून, याच व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कर्नाटक सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम सुरू केला असून, हा शासनमान्य अभ्यासक्रम असल्याचे गुंजटकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

 belgaum

महापालिकेच्या ULMS प्रणालीमध्ये JOC डिप्लोमा धारकांच्या परवाना नूतनीकरणासाठी आवश्यक पर्याय उपलब्ध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे NIRMAN-2 पोर्टल सुरू करून JOC डिप्लोमा धारकांची नोंद करून परवाना नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ULMS मध्ये पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मागील सहा महिन्यांपासून बांधकाम आराखड्यांच्या मंजुरीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला असून, महापालिकेच्या महसुलाचेही नुकसान होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मागील सहा महिन्यांत केवळ एका प्लॅनला मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

या प्रश्नासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे यापूर्वी अनेक निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही किंवा उत्तर मिळाले नसल्याचे गुंजटकर यांनी सांगितले.

त्यामुळे महापालिका आयुक्त एम. जी. कार्तिक यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन NIRMAN-2 प्रणालीमध्ये JOC डिप्लोमा धारकांसाठी आवश्यक पर्याय उपलब्ध करून परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विनायक गुंजटकर यांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.