belgaum

कुमारिकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेतील आजचा शेवटचा वार पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार कुमारिकांनी देवीला जल अर्पण करून पूजा केली. यानंतर उपस्थित कुमारिकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

श्री मंगाई देवस्थान समिती आणि वडगावातील विविध युवक मंडळांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे एक हजार ते बाराशे कुमारिकांना वह्या, पेन, पेन्सिलसह अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कलश घेऊन आलेल्या कुमारिकांनी देवीला जल अर्पण करत धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून धार्मिक संस्कारांसोबतच विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे.

 belgaum

दरम्यान, श्री मंगाई देवी यात्रेचा मुख्य सोहळा मंगळवारी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान गाऱ्हाणे उतरवून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. विविध राज्यांतून येणाऱ्या भाविकांनी यात्रेत शांतता आणि शिस्त राखून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून संपूर्ण वडगाव परिसरावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाला सहकार्य करून यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पाडावी, असे आवाहनही आयोजकांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.