belgaum

हेब्बाळकर समर्थकांचे आंदोलन; बेळगावात दोन ठिकाणी रास्ता रोको

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांचा संताप उफाळून आला. मंत्रिमंडळातील नाव जाहीर होताच बेळगावात दोन ठिकाणी शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले आणि जोरदार रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

हिरे बागेवाडी टोलनाक्याजवळ तसेच बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात हेब्बाळकर समर्थकांनी वाहतूक रोखून घोषणाबाजी केली. “लक्ष्मी हेब्बाळकर यांना तात्काळ मंत्रिमंडळात स्थान द्या”, “बेळगाव जिल्ह्यावर अन्याय चालणार नाही” अशा घोषणा देत समर्थकांनी काँग्रेस सरकारविरोधात संताप व्यक्त केला. काही काळ या आंदोलनामुळे दोन्ही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला.

समर्थकांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्याला मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असून, लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव चर्चेत असतानाही त्यांना संधी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस हायकमांडने या निर्णयाचा फेरविचार करून हेब्बाळकर यांना लवकरात लवकर मंत्रिपद द्यावे, अशी मागणी केली.

 belgaum

काँग्रेस कार्यालयासमोर देखील हेब्बाळकर समर्थकानी घोषणाबाजी करत मंत्रिपद देण्याची मागणी केली.

दरम्यान, मंत्रिमंडळात अद्याप एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून, त्या जागेसाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते, याकडे बेळगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बेळगाव जिल्ह्यातून मागील सिद्धरामय्या सरकारच्या काळात मंत्री असलेल्या हेब्बाळकर यांचा पत्ता कट करण्यात आला असून बेळगाव जिल्ह्यातून अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना मंत्रीपद मिळाले आहे सवदी यांनी डी के शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात सोमवारी सायंकाळी मंत्री पदाची शपथ घेतली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.