belgaum

पाणीटंचाईची चाहूल!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : यंदा पावसाने दडी मारल्याने जलस्रोतांमधील पाणीसाठ्यावर ताण वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करत शेतीसाठी पाणी वापरण्यावर बंदी घालण्यात आली असून, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

कृष्णा नदीतील अडीच टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून, नदीकाठच्या भागात आठवड्यातून दोन दिवस वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. ऊसतोड सुरू असल्याने पुढील तीन दिवस वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. हिडकल जलाशयातील पाण्याचा जूनपर्यंत पिण्यासाठी वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मलप्रभा नदीतील १४ टीएमसी पाण्यातून धारवाड, रोण, बैलहोंगल आणि सौंदत्ती तालुक्यांच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जात आहे.

 belgaum

धारवाडला दररोज ६० हजार क्युसेक पाणी, तर बैलहोंगल, सौंदत्ती आणि रोण या भागांना मिळून १५० क्युसेक पाणी दिले जात आहे. पिण्याच्या पाण्याची गरज आणि नविलतीर्थ जलाशयातील उपलब्ध पाणीसाठ्याबाबत प्रादेशिक आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीसाठी पाण्याचा वापर करण्यास सरकारने बंदी घातली असून, केवळ पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. नागरिक आणि जनावरांसाठीच पाणी सोडण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.