belgaum

कॅन्टोन्मेंट रस्ते हस्तांतरणावर हरकतींचे आवाहन

0
Bgm cantt
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने कॅन्टोन्मेंटमधील काही रस्त्यांच्या उघडणे व बंद करण्यासंदर्भातील प्रस्तावावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.

प्रस्तावित रस्ते हस्तांतरणाबाबत प्रसिद्धीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत लेखी हरकती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक सूचनेनुसार अल्बर्ट एक्का रोड, स्मार्ट रोड आणि क्विन्स गार्डन रोड हे कॅन्टोन्मेंटचे रस्ते एमईएसच्या ‘क्लास ए’ जमिनीवर हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे.

 belgaum

तर एमईएसच्या ताब्यातील जिमखाना रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

या प्रस्तावावर हरकत अथवा सूचना असल्यास त्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, बेळगाव यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.