बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करणे आणि ‘एसआयआर’ मोहिमेच्या अत्यंत संथ कारभारावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रविवार रात्रीपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचा ‘डेडलाईन’ वजा इशारा त्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना दिला आहे.
प्रगती आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. जिल्ह्यातील ४१ लाख ७ हजार अर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ३० टक्केच काम झाल्यामुळे, कर्मचाऱ्यांनी शनिवार आणि रविवारीही सुट्टी न घेता फील्डवर काम करावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

विशेषतः बेळगाव उत्तर, अथणी आणि कडावड या भागातील कामगिरी अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
या भागातील बीएलओ कर्मचाऱ्यांनी तात्काळ ॲपवर माहिती अपलोड करून डिजिटलायझेशनचे काम पूर्ण करावे; अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.




