belgaum

कंग्राळी बुद्रुकमध्ये उभ्या ट्रकमध्ये चालकाचा गूढ मृत्यू

0
909
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथील मुख्य रस्त्यावर स्वतःच्याच मालकीच्या ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली. गजानन वामन हुरुडे (रा. कलमेश्वर गल्ली) असे मृत चालकाचे नाव आहे.

रविवारी रात्री त्यांनी कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीसमोरील मुख्य रस्त्यावर आपला ट्रक पार्क केला होता आणि ते नेहमीप्रमाणे ट्रकमध्येच झोपायला गेले होते. मात्र, सोमवारी सकाळ झाली तरी ट्रकमधून कोणतीही हालचाल न झाल्याने स्थानिक नागरिकांना संशय आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता गजानन हे ट्रकमध्येच बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून काकती पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रीतसर पंचनामा केला आणि मृतदेह ट्रकमधून बाहेर काढला. गजानन यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 belgaum

मृत्यूमधील गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतरच या मृत्यूमागचे खरे कारण स्पष्ट होईल. मुख्य रस्त्यावरच ही दुर्दैवी घटना घडल्याने कंग्राळी बुद्रुक परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून काकती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.