belgaum

शिवम् असोसिएट्स प्रकरणात करवे जिल्हाध्यक्ष सीआयडीच्या रडारवर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील शिवम् असोसिएट्स कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष अभिलाष यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांवरून सीआयडीने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्या शिवानंदने बेळगावमधील एका कार्यक्रमानंतर अभिलाष यांना दीड कोटी रुपयांची कार भेट दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच अभिलाष यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातही हाच पैसा लावल्याचे शिवानंदने सीआयडी चौकशीत मान्य केले आहे.

या आर्थिक देवाणघेवाणीप्रकरणी सीआयडीने अभिलाष यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी पाचारण केले होते. मात्र, नोटीस मिळूनही त्यांनी तपासात सहकार्य न करता गैरहजर राहणे पसंत केले आहे.

 belgaum

वारंवार टाळाटाळ करणाऱ्या अभिलाष यांना ताब्यात घेण्यासाठी सीआयडीचे विशेष पथक सज्ज झाले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.