belgaum

बेळगाव-गोवा महामार्गावर भीषण अपघात : 2 ठार, 3 गंभीर जखमी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार आणि टेम्पो यांची समोरासमोर टक्कर होऊन घडलेल्या भीषण अपघात 2 जण जागीच ठार, तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर-अनमोड घाट मार्गावर गवेगाळी क्रॉस येथे काल बुधवारी मध्यरात्री घटना घडली. वाहनांची टक्कर इतकी जबरदस्त होती की कार आणि टेम्पोच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश पासिंगची कार (एपी 02 बीएएन 0292) गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने येत होती. त्याचवेळी कोंबड्यांनी भरलेला टेम्पो (जीए 09 यू 6990) गोव्याच्या दिशेने जात होता. संबंधित टेम्पो हा गोव्यातील केपे येथील असून कर्नाटकातून बॉयलर कोंबड्या घेऊन गोव्याकडे निघाला होता.

गवेगाळी क्रॉस येथे कार चालक समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने कारला जोरदार ठोकले. ही ठोकर इतकी जबरदस्त होती की तिचा आवाज आवाज दूरपर्यंत ऐकू गेला.

 belgaum

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टेम्पोतील कोंबड्याही रस्त्यावर विखुरल्या गेल्या होत्या या भीषण अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. मृत दोघेही आंध्र प्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अपघातात कार चालक आणि टेम्पोमधील नवरा-बायको गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. ही दुर्घटना बुधवारी रात्री साधारण दीडच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. सततचा पाऊस, घाट परिसरातील धोकादायक वळणे आणि वेगवान वाहनचालन यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. अपघाताची रामनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.