बेळगाव लाईव्ह :शिंदोळी रोड या रस्त्याशेजारी सध्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले कचऱ्याचे साम्राज्य तात्काळ हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.
शिंदोळी रोड या रस्त्याशेजारी अलीकडे मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्त्याच्या ठराविक भागात दुर्गंधीसह मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या अस्वच्छताचा त्रास दररोज या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना होत आहे.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिंदोळी रोड या रस्त्याशेजारी साचलेल्या कचऱ्याची ताबडतोब उचल करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.





