belgaum

बेळगाव आरटीओ मार्च 2026 : दुचाकींचा दबदबा, उत्पादकांमध्ये TVS अव्वल

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मार्च 2026 महिन्यात बेळगाव आरटीओ कार्यालयात एकूण 5,476 वाहनांची नोंदणी झाली असून, यामध्ये नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनांचे (5,167) प्रमाण ट्रान्सपोर्ट वाहनांच्या (309) तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये दुचाकींचा मोठा वाटा असून मोटार सायकल/स्कूटर या प्रकारात सर्वाधिक 4,268 वाहनांची नोंद झाली. त्याखालोखाल मोटार कार (717) आणि मोपेड (113) या प्रकारांचा क्रम लागतो.

ट्रान्सपोर्ट वाहनांमध्ये मालवाहतूक करणाऱ्या गुड्स कॅरियर वाहनांची संख्या सर्वाधिक 209 इतकी नोंदवली गेली. त्याचबरोबर थ्री-व्हीलर पॅसेंजर (32) आणि मोटार कॅब (37) यांचाही सहभाग दिसून आला. मात्र, ई-रिक्षा विथ कार्ट, अॅम्ब्युलन्स, ट्रेलर (कमर्शियल), मॅक्सी कॅब, प्रायव्हेट सर्व्हिस व्हेईकल, ओम्नी बस आणि अडॅप्टेड व्हेईकल या काही प्रकारांमध्ये केवळ प्रत्येकी 1 वाहनाची नोंद झाली.

 belgaum

इंधन प्रकारानुसार पाहता पेट्रोल/इथेनॉलवर चालणारी वाहने सर्वाधिक 2,354 नोंदली गेली. त्यापाठोपाठ पेट्रोल (1,320) आणि शुद्ध इलेक्ट्रिक वाहनांची (1,099) नोंद झाली आहे. यावरून पारंपरिक इंधनाबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांकडेही नागरिकांचा कल वाढत असल्याचे दिसते.

उत्पादक कंपन्यांमध्ये TVS Motor Company Ltd ने 1,056 वाहन नोंदणीसह अव्वल स्थान मिळवले. त्यापाठोपाठ Honda Motorcycle and Scooter India (1,007) आणि Hero MotoCorp (940) यांचा क्रम लागतो. काही उत्पादकांनी मात्र केवळ 1 वाहनाची नोंद केली असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

एकूणच, मार्च महिन्यात बेळगावमध्ये दुचाकींची वाढती मागणी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता कल अधोरेखित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.