बेळगाव लाईव्ह : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, आज संपूर्ण बेळगाव शहर आणि तालुका परिसरात मद्यविक्री बंद राहणार आहे.
शिवजयंती उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मद्यविक्री आणि मद्यवाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी हे आदेश दिले आहेत.
२१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०६:०० ते २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०६:०० पर्यंत बेळगाव पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व मद्यविक्रीची दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेलमधील मद्यविक्री पूर्णपणे बंद राहील. या काळात सर्व अबकारी दुकाने बंद ठेवून त्यांना सील लावण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.





