Home बातम्या शहापुरात अवतरला शिवकालीन युद्धकलेचा इतिहास
belgaum

शहापुरात अवतरला शिवकालीन युद्धकलेचा इतिहास

0
शहापुरात अवतरला शिवकालीन युद्धकलेचा इतिहास
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावात १०७ वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक शिवजयंती उत्सवा निमित्त गाडेमार्ग बिचू गल्ली शहापूर येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ आयोजित शिवसंस्कृतीचा वारसा जपत आणि इतिहासातील पराक्रम जागवत, शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी बिचू गल्ली गाडेमार्ग येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय बैलूरकर हे होते तर उद्घाटक म्हणून बेळगावचे पोलीस आयुक्त श्री.भूषण गुलाबराव बोरसे हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक नेताजी जाधव,जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी,युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,मोतेश बारदेशकर,अहमद रेशमी,नगरसेवक जयंत जाधव,पत्रकार श्रीकांत काकतीकर,विश्वनाथ येळ्ळूरकर,पियुष हावळ,युवासेनेचे विनायक हुलजी हे होते.

या कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ,आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत दर्शन घडविण्यात आले, शिवकालीन युद्धकलेचा थरारक अनुभव शिवप्रेमींनी घेतला.


वस्ताद आनंद ठोंबरे यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद तर मिलिंद सावंत यांच्या खणखणीत आवाजात शिवपोवाडयानी शिवप्रेमी मंत्रमुग्ध झाले, किरण जाधव यांनी संघनायक म्हणून व इतर सहकाऱ्यांनी दाखवलेली शिवकालीन युद्धकलेची साहसी थरारक प्रात्यक्षिके डोळ्यांचे पारणे फेडणारी होती, पाच वर्षांच्या जिजा किरण जाधव या बालिकेने दाखवलेली युद्धकला पाहून शिवप्रेमींनी कौतुकाची थाप दिली. शिवसंस्कारातून समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ येथील शेकडो शिवप्रेमींनी घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे प्रमुख सल्लागार अशोक घगवे, सुरज जाधव,निलेश काकतकर,मंडळाचे अध्यक्ष सचिन धाडवे, सचिव विशाल सावंत,सदस्य विनायक पाटील,ओमकार बैलूरकर,विद्देश बडसकर,उमेश पाटील,राजू पाटील,परिनय कदम,अभिषेक तरळे,आदीनी परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.