belgaum

वाढला उन्हाचा पारा; उष्म्याने बेळगावकर हैराण

0
708
Garmi Sumner unhala
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील तापमानात गेल्या तीन-चार दिवसांपासून झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिक उकाड्याने हैरान झाले असून आज सकाळी शहरातील कमाल तापमानाने 37 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता.

आठवड्यापूर्वी झालेल्या वळीव पावसामुळे बेळगाव शहरातील तापमानात कांही अंशी घट झाली होती. तथापि आता गेल्या तीन-चार दिवसांपासून उष्म्यामध्ये झपाट्याने वाढ होत असून आज सोमवारी सकाळी किमान तापमान 23 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले.

सध्या शहरवासीय उकाड्याने हैराण झाले असून उन्हाचा फटका नागरिकांच्या विशेषता लहान मुलांच्या आरोग्यावर बसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केली आहे.

 belgaum

उन्हाचा पारा वाढल्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना टोपी, छत्री वगैरे यांचा आधार घ्यावा लागत आहे. एकंदरीत यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरत असून पुढील दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांना खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.