belgaum

घरफोडी प्रकरणी एकाला अटकएका वर्षातील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा

0
366
Camp police
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. गोव्यातील रहिवासी असलेल्या या आरोपीकडून सुमारे २४ लाख रुपये किमतीचे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

​शिवराम गणपती भट यांनी १७ एप्रिल २०२५ रोजी घरामध्ये चोरी झाल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते.
​या पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे गोव्यातील म्हापसा येथील तंगराज सेल्वराज आचार्य या ४० वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने वर्षभरापूर्वी गणेशपूर येथील सरस्वती नगर आणि आठ महिन्यांपूर्वी मिलिटरी क्वार्टर्स परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

​आरोपीने गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे दागिने पोलिसांसमोर हजर केले असून ते तपासादरम्यान जप्त करण्यात आले आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पोलीस निरीक्षक आनंद वनकुद्रे, पीएसआय रुक्मिणी, पीएसआय सनदी आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.