belgaum

गर्दीत ‘फोन पे’ दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची फसवणूक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरात पेट्रोल आणि डिझेलची निर्माण होणार असल्याची अफवा पसरवून मागील दोन दिवस सर्वच पेट्रोल पंपांवर झालेल्या गर्दीचा फायदा घेत अनेक वाहन चालकांनी ‘फोन पे’ केल्याचे दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

‘पेट्रोल व डिझेल मिळणार नाही’, या अफेमुळे गेल्या सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत बेळगाव शहरातील पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. इंधन तुटवड्याची कोणतीही अधिकृत माहिती नसताना केवळ सोशल मीडियावर पसरलेल्या संदेशामुळे पेट्रोल पंपावर अभूतपूर्व गर्दी उसळली होती.

आता या गर्दीचा गैरफायदा घेत अनेक वाहन चालकांनी ‘फोन पे’ च्या माध्यमातून पेट्रोलचे पैसे भरत असल्याचे दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

 belgaum

यामुळे पेट्रोल पंपांवरील संबंधित कर्मचाऱ्यांना पंप मालकाचा राग ओढून घ्यावा लागला असून मालक मंडळींवर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

दरम्यान सोमवार आणि मंगळवारी पेट्रोल पंपावर झालेली गर्दी काल बुधवारपासून ओसरली असून आज सकाळी तर बरेच पेट्रोल पंप ग्राहकांविना ओस पडले होते. त्यामुळे संबंधित पेट्रोल पंपावरील कर्मचारी आरामात बसून विश्रांती घेताना दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.