belgaum

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला 3 वर्षे कारावासाची शिक्षा

0
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या गणेशपुर बेळगाव येथील एका युवकाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय -01 बेळगावच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी 3 वर्षे कारावासाच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

कारावासाची शिक्षा झालेल्या युवकाचे नांव सचिन लक्ष्मण कातकर (वय 30, रा. घर नं. 2141, प्लॉट नं. 18, सिंडिकेट बँक कॉलनी जवळ लक्ष्मीनगर, गणेशपुर बेळगाव) असे आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादीने कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील आरोपीने गेल्या 8 मार्च 2022 रोजी आपल्या प्लॉट समोर थांबून त्या मुलीला आपले गुप्तांग दाखवण्याबरोबरच अश्लील हावभाव केले.

त्याचप्रमाणे तिच्या घरच्या लोकांना अर्वाचे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. परिणामी मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी विरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी व तपास करून पोलिसांनी आरोपी विरुद्ध साक्षीपुरावे गोळा करून बेळगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय -01 मध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.

 belgaum

या खटल्याची काल अंतिम सुनावणी होऊन न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी एकूण 7 साक्षीदारांच्या साक्ष आणि 13 पुरावे ग्राह्य मानून आरोपी सचिन लक्ष्मण कातकर याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा निकाल देण्याबरोबरच त्याला भादवि कलम 354 (ए) नुसार 3 वर्षे कारावासाच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने जादाचा कारावास अशी शिक्षा ठोठावली.

त्याचप्रमाणे नुकसान भरपाई दाखल जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाला पीडित मुलीला 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. या खटल्यात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.