Home बातम्या रामचंद्र राव प्रकरण : ‘एआय’ नव्हे अस्सल व्हिडिओ, एफएसएल अहवालात उघड झाले सत्य
belgaum

रामचंद्र राव प्रकरण : ‘एआय’ नव्हे अस्सल व्हिडिओ, एफएसएल अहवालात उघड झाले सत्य

0
रामचंद्र राव प्रकरण : ‘एआय’ नव्हे अस्सल व्हिडिओ, एफएसएल अहवालात उघड झाले सत्य
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कार्यालयामध्ये कर्तव्यावर असताना महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित झालेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि डीजीपी के रामचंद्र राव यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित महत्त्वाची माहिती उजेडात आली आहे.

समाज माध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ संपूर्णपणे खरा आहे. तो कोणत्याही रितीच्या डीपीफेक, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अथवा एडिट करून निर्मित केलेला नाही, याला अधिकृत पुष्टी मिळाली आहे. यामुळे निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर आता कठोर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आली आहे.

राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात गाजावाजा झालेल्या या प्रकरणाचा पारदर्शक तपास होण्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक एडीजीपी आर. हितेंद्र यांच्या नेतृत्वाखाली चार आयपीएस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन केले होते.

या उच्चस्तरीय समितीने राज्य सरकारला आपला एकूण 100 पानांचा तपशीलवार अहवाल सादर केला असून तो व्हिडिओ संपूर्णपणे खरा, अस्सल असल्याचे स्पष्ट केले आहे.

igp ramchandra rao

विधीविज्ञान प्रयोग शाळेच्या (एफएसएल) तज्ञांनी तो व्हिडिओ बारकाईने तपासला असून त्यातील दृश्यांमध्ये कोणत्याही प्रकारची तांत्रिक छेडछाड अथवा एडिटिंग झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कार्यालयात घडलेली ती घटना संपूर्णपणे सत्य असल्याचे नमूद केले आहे. के रामचंद्र राव हे 2016 -17 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी बेळगाव विभागाचे आयजीपी म्हणून सेवा बजावली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.