Home बातम्या दोडवाड हत्याकांडाचा २४ तासांत छडा
belgaum

दोडवाड हत्याकांडाचा २४ तासांत छडा

0
दोडवाड हत्याकांडाचा २४ तासांत छडा
 belgaum

 belgaum


बेळगाव लाईव्ह : बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड येथे वैयक्तिक वादातून घडलेल्या एका निर्घृण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. घरासमोरील रस्त्याचा किरकोळ वाद विकोपाला गेल्याने आपल्याच नातेवाईकाची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

दोडवाडमधील कोप्प अगसी भागातील रहिवासी महेश बसय्या उपनिमठ यांची १७ मार्च रोजी सायंकाळी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी रुद्रय्या बसय्या उपनिमठ (वय ३६) याला अटक केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी आणि मृत महेश यांच्यात घरासमोरील रस्त्याच्या वापरावरून वाद आणि जुने वैमनस्य सुरू होते. घटनेच्या दिवशी चिकन सेंटरजवळ झालेल्या बाचाबाचीत महेश यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा राग मनात धरून आरोपीने दबा धरून महेश यांच्यावर कोयत्याने वार केले.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. सीपीआय शिवानंद गुडगनट्टी आणि पीएसआय एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाडसी कारवाई करत १८ मार्च रोजी आरोपीला जेरबंद केले.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बैलहोंगल विभागातील या तत्पर कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.