belgaum

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

0
531
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांच्या सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. ऋतेश अनिल भोसले (वय २२, रा. कंग्राळी बुद्रुक ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अत्याचार आणि मारहाणीचा गुन्हा सिद्ध झाला आहे.

काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२५ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने पीडित मुलीच्या हतबलतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता आणि याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या गंभीर प्रकरणी काकती पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

 belgaum
Conviction

विशेष जलदगती पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी ९ साक्षीदार आणि ४७ कागदपत्रांच्या आधारे आरोपीला दोषी धरले. न्यायालयाने आरोपीला ३० वर्षे कैद आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त २ वर्षे कारावास भोगावा लागेल.

न्यायालयाने पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ६ लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले असून ही रक्कम ५ वर्षांसाठी बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाणार आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोजक एल. व्ही. पाटील यांनी या प्रकरणात काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.