belgaum

ढगांच्या आडून डोकावला ‘ब्लड मून’;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: यंदाच्या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आज सायंकाळी पार पडले. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे चंद्रदर्शन होईल की नाही याबाबत साशंकता होती; मात्र संध्याकाळी क्षणभर ढगांच्या फटीतून लालसर चंद्राचे दर्शन होताच बेळगावकरांनी ‘ब्लड मून’चा अद्भुत नजारा अनुभवला.

हे ग्रहण साधे नव्हते, तर पूर्ण खग्रास चंद्रग्रहण होते. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये आल्यावर तिची सावली पूर्णपणे चंद्रावर पडते. अशावेळी चंद्र काळा न दिसता गडद तांबूस-लाल रंगाचा दिसतो. या नैसर्गिक प्रक्रियेलाच वैज्ञानिक भाषेत ‘ब्लड मून’ असे संबोधले जाते.

भारतीय वेळेनुसार ग्रहण दुपारी 3.20 वाजता सुरू झाले असले तरी त्यावेळी चंद्र भारतात दिसत नव्हता. संध्याकाळी सुमारे 6.26 नंतर चंद्रोदय झाला आणि शेवटच्या टप्प्यातील ग्रहणाचे दर्शन अवघ्या 15 ते 20 मिनिटांसाठी मिळाले. सुमारे 6.46 ते 6.47 दरम्यान ग्रहण समाप्त झाले.

 belgaum

दिवसभर आकाश ढगांनी व्यापलेले असतानाही, सायंकाळी थोड्या वेळासाठी आकाश स्वच्छ होताच लालसर चंद्राचे दर्शन झाल्याने खगोलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात हा क्षण टिपण्याचा प्रयत्न केला.

निसर्गाच्या या विलक्षण रंगछटांनी बेळगावकरांना थोड्याच वेळासाठी का होईना, पण अविस्मरणीय अनुभव दिला

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.