belgaum

भंगार अड्ड्यांमुळे शहापूर परिसरातील नागरिक हैराण

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मधील भंगार (स्क्रॅप) अड्ड्यांमुळे सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात नगरसेवक रवी साळुंके यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संबंधित मालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहापूर येथील नवी गल्ली आणि परिसरातील वॉर्ड क्रमांक २७ मध्ये सध्या चार मोठे भंगार अड्डे सुरू आहेत. हे चालक भंगाराचे साहित्य थेट रस्त्यावर आणि पदपथांवर ठेवतात. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. या त्रासामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नगरसेवक रवी साळुंके यांनी यापूर्वी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी महापालिकेला पत्र देऊन या समस्येची दखल घेण्याची विनंती केली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा स्मरणपत्र देऊन आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

 belgaum

संबंधित भंगार अड्ड्यांच्या मालकांना सार्वजनिक शांतता आणि वाहतुकीला अडथळा न करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जर त्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढले नाही, तर ही दुकाने तातडीने बंद करण्यात यावीत, अशी मागणी रवी साळुंके यांनी केली आहे.

महापालिकेने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन कडक पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.