belgaum

महापौरानी केली जन्म-मृत्यू विभागाची अचानक पाहणी

0
500
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत जन्म-मृत्यू दाखले मिळवताना नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महापौर आणि त्यांच्या टीमने प्रशासकीय सुधारणांसाठी कंबर कसली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या विभागात कामाचा डोंगर आणि लोकांची गर्दी वाढल्याने गोंधळाचे वातावरण होते. ही तक्रार थेट महापौरांपर्यंत पोहोचल्यानंतर, महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी अचानक महापालिकेत जाऊन संबंधित विभागाची पाहणी केली आणि कामकाजातील त्रुटींवर बोट ठेवले.

विभागातील कर्मचाऱ्यांवरील ताण आणि जागेची कमतरता यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे महापौरांनी स्वतः पाहिले. यावर केवळ चर्चा न करता, त्यांनी तातडीने या विभागासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याचे आणि विस्तार करण्याचे स्पष्ट आदेश महापौर मंगेश पवार यांनी प्रशासनाला दिले.

नव्या आराखड्यानुसार, जादा कर्मचारी आणि अतिरिक्त काऊंटर्सद्वारे ही सेवा लोकाभिमुख केली जाणार आहे. याशिवाय, नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून अद्ययावत बैठक व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना महापौर मंगेश पवार यांनी दिल्या आहेत.

यामुळे महापालिकेत फेऱ्या मारणाऱ्या बेळगावकरांचा वेळ आणि श्रम वाचणार असून कामात पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.