वळी घातलेले 40 पोती भात, गवत भस्मसात

0
23
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शेतामध्ये वळी घालून ठेवलेले सुमारे 40 पोती भात आणि गवत आगीमध्ये भस्मसात झाल्याची घटना येळ्ळूर येथे उघडकीस आली. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

आगीत भस्मसात झालेले भात व गवत खानापूर रोड, मच्छे येथील नागेश मऱ्याप्पा हावळ यांच्या मालकीचे होते. दररोजच्या प्रमाणे नागेश हावळ हे गेल्या बुधवारी रात्री 40 पोती भात व दोन ट्रॅक्टर गवताची वळी घालून घरी परतले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात गेले असता वळी घातलेले भात आणि गवत आगीत भस्मसात होऊन जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 belgaum

यामुळे शेतकरी हावळ यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. दरम्यान हावळ यांचे वाईट चिंतनाऱ्या अज्ञातांकडून भाताची वळी व गवत पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.