belgaum

गांजा सेवन करणारा ताब्यात

0
80
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील रुक्मिणी नगर येथे सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करून वावरणाऱ्या एकाला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या इसमाचे नांव आनंद मारुती नाईक (वय 36, रा. पाचवा क्रॉस, रुक्मिणीनगर बेळगाव) असे आहे. सदर इसम रुक्मिणीनगर येथे अनैसर्गिक वर्तन करत होता.

माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होण्णप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आनंद याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोणत्यातरी मादक पदार्थाचे सेवन केल्याचे लक्षात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

मटका बुकी हिरेबागेवाडी पोलिसांच्या ताब्यात

हिरेबागेवाडी -बसापुर रस्त्यालगत ओसी मटक्याचे आकडे येणाऱ्या एका भटका बुकिला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून रोख 820 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. अटक केलेल्या आरोपीचे नांव उळवेश मडिवाळ कुरबर (वय 23, रा. हुलीकवी ता. जि. बेळगाव) असे आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.