बेळगाव लाईव्ह :शिक्षणातून माणूस घडत असतो.अपयश आले म्हणून खचून जाऊ नका.जिद्द ठेवा.अथक परिश्रम करून यशस्वी व्हा.पालक शिक्षक यांच्या कडून योग्य मार्गदर्शन मिळते.भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नियमितपणे अभ्यास करा.मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करा.ध्येय निश्चित करुन पुढील अभ्यासक्रम निवडा.आवडीच्या क्षेत्रात कौशल्य वापरून विकास साधा.वेळेचे भान ठेवून जीवनात यशस्वी व्हा.अपयश आले म्हणून खचून न जाता जिद्द चिकाटीने प्रयत्न करावा.असे मौलिक विचार अध्यक्षस्थानावरून बोलताना मनोहर बेळगावकर यांनी कावळेवाडी येथे आयोजित केलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभात विचार व्यक्त केले.
सुरूवातीला मनोहर बेळगावकर व अॅड नामदेव मोरे यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो
संस्था अध्यक्ष वाय पी नाईक यांनी प्रास्ताविक करुन गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.कौतुकाची थाप अधिक आत्मविश्वासाने जगायला शिकवते.विद्यार्थी हाच समाजाचा कणा असतो कोणतेही पुस्तक उपलब्ध करून देण्यात येईल नि संकोचपणे मागणी कराअसे आवाहन केले.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
यावेळी रेणू इन्स्टिट्यूट चे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक कोमल गावडे यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.तसेच मर्चंट नेव्ही चे उत्तम मा.बाचीकर यांचाही सन्मान करण्यात आला.

बारावी उत्तीर्ण मधुरा प मोरे(विज्ञान शाखा) उर्मिला कणबरकर (वाणिज्य शाखा) दहावी परीक्षेत इंग्रजी विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करणारी आरती र.मोरे (81%) प्रियांका प्र.मोरे(बिजगर्णी हाय.द्वितीय क्रमांक) सार्थक बाचीकर(87% माध्यमिक विद्यालय कर्ले, द्वितीय क्रमांक) सलोनी मोरे,संध्या पाटील, दिव्या यळुरकर, तसेच राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पैलवान कु.रवळनाथ कणबरकर बालवीर बेळगुंदी दहावी परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान चिन्ह, फोल्डर फाईल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच विविध स्पर्धांतूनयश संपादन केल्यामुळे सहावी उत्तीर्ण विद्यार्थीतिनिंचा कु.स्वप्नाली बडसकर,निशा गावडे,निशा कुंडेकर, सोनिया पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी अॅड नामदेव मोरे, यशवंतराव मोरे यांनी मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या
व्यासपीठावर अध्यक्ष मनोहर बेळगावकर, ग्रामस्थ मंडळ चेअरमन जोतिबा मोरे, रघुनाथ मोरे,केदारी कणबरकर, सूरज कणबरकर, गोपाळ जाधव, सुनील बेनके,पी.एस.मोरे, प्रकाश मोरे पी.आर.गावडे युवराज नाईक,मल्लापा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते जयवंत बाळेकुंद्री मण्णूर, यांनी पुरस्कृत केला होता सूत्रसंचालन कोमल गावडे यांनी, आभार मनोहर मोरे यांनी मानले