बेळगाव लाईव्ह :बेळगाव मधील हॉकीचा इतिहास जमा झालेला सुवर्णकाळ परत आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हॉकी बेळगाव संघटनेने प्रशिक्षित केलेल्या 5 हॉकीपटूंची राज्य सरकारच्या म्हैसूर आणि बळ्ळारी येथील युथ स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी अभिनंदन निवड झाली आहे.
देशाला बंडू पाटील, शंकर लक्ष्मण यांच्यासारखे ऑलम्पियन हॉकीपटू देणाऱ्या बेळगावचा तत्कालीन हॉकी खेळाचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठीच्या हॉकी बेळगाव या संघटनेच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर या संघटनेचे हॉकीपटू चमकू लागले असून आता 4 महिला हॉकीपटूंची म्हैसूर येथील युथ स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी, तर एका पुरुष हॉकीपटूची बळ्ळारी युथ होस्टेलसाठी अभिनंदन या निवड झाली आहे.
म्हैसूर येथील युथ स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झालेल्या बेळगावच्या होतकरू महिला हॉकीपटूंची नावे मयुरी कंग्राळकर, साक्षी संदीप पाटील, साक्षी चौगुले आणि आयेशा शेख अशी आहेत. या खेरीज प्रवीण जक्कन्नवर या होतकरू हॉकीपटूची बेळळारी स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या हॉकीपटूंचे 11 वी नंतरचे शिक्षण आणि हॉकी प्रशिक्षण मोफत असणार असून संबंधित खर्च सरकार उचलणार आहे.

निवड झालेल्या महिला हॉकीपटूंपैकी मयुरी कंग्राळकर, साक्षी पाटील आणि साक्षी चौगुले या मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित खानापुरातील ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. मयुरी ही खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील रहिवासी असून साक्षी पाटील असोगा येथील रहिवासी आहे. चौथी हॉकीपटू आयेशा शेख ही देखील खानापूरची रहिवासी आणि ताराराणी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. या चार मुलींबरोबरच बळ्ळारी स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी प्रवीण जकन्नावर याची निवड झाली आहे. भंडारी हायस्कूलचा विद्यार्थी असलेला प्रवीण हा अनगोळचा रहिवासी आहे.
युथ होस्टेलसाठी निवड झालेल्या या हॉकीपटुंना हॉकी बेळगावचे सरचिटणीस व हॉकी प्रशिक्षक सुधाकर चाळके आणि उत्तम शिंदे यांचे मार्गदर्शन तसेच हॉकी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांच्यासह मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या संस्थापिका राजश्री हलगेकर -नागराजू यांचे प्रोत्साहन लाभत आहे.