Wednesday, June 18, 2025

/

श्रेयश पाटीलची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अनेक खेळाडू वेगवेगळ्या खेळातून वेगवेगळ्या स्तरावर चमकत असतात. बेळगाव शहराच्या उत्तर ग्रामीण भागातील खेळाडूंनी फुटबॉल मध्ये विशेष चमक दाखवली आहे. उत्तर ग्रामीण भागातील कडोली गावच्या निवृत्ती पावनोजी याने कोल्हापूर मधील पेटीएम संघातून खेळताना चमक दाखवली असताना अगसगा येथील श्रेयश पाटीलची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बंगळूरू फुटबॉल क्लब संघाचा तो सदस्य असून केपीसीसी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक आणि केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांचा तो पुतण्या आहे. त्याने नुकतंच एआयएफएफ जूनियर फुटबॉल चॅम्पियनशिपच्या झोनल राउंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर प्रवेश केला आहे.Football

श्रेयश आणि त्याचा संघ १३ एप्रिल २०२५ रोजी इंडोनेशियामध्ये होणाऱ्या ‘इंटरनॅशनल बाराती कप’ फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जात आहेत.

श्रेयश पाटील आणि बीएफसी यु 15 संघाने एआयएफएफ जूनियर टूर्नामेंट (आय-लीग)’च्या झोनल राउंडमध्ये विजय मिळवून राष्ट्रीय राउंडमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. हा राष्ट्रीय राउंड मे २०२५ मध्ये होईल.

त्यासोबतच श्रेयश आणि त्याचा संघ १३ एप्रिल २०२५ रोजी इंडोनेशियामध्ये होणाऱ्या ‘इंटरनॅशनल बाराती कप’ फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. श्रेयश पाटीलच्या कुटुंबीयांनी त्यांच्या या यशाबद्दल मोठा आनंद व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.