Monday, May 12, 2025

/

बेळगाव न्यायालय आवारात समुदाय भवनाचे लोकार्पण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा न्यायालयात नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज समूदाय भवनाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रामचंद्र हुद्दार, आम. असिफ सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

बेळगाव जिल्हा न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बार असोसिएशन यांच्या संयुक्त पुढाकारातून बेळगाव न्यायालयाच्या आवारात समूदाय भवन, प्रशासकीय इमारत आणि कॅन्टीनच्या नव्या सुविधांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रामचंद्र हुद्दार, विजयकुमार पाटील आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून भवनाचे उद्घाटन केले.

यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रामचंद्र हुद्दार बोलताना म्हणाले, कनिष्ठ वकिलांसाठी न्यायालयीन परिसर हे शिक्षणाचे उत्तम माध्यम आहे. न्यायाच्या प्रक्रियेतील नव्या गोष्टी शिकण्यासाठी रोज खुले न्यायालय पाहण्याचे आवाहन त्यांनी वकिलांना केले.

कार्यक्रमात आमदार आसिफ सेठ यांनी न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी निधी मंजूर केल्याची माहिती दिली. न्यायालयीन परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि वकिलांसाठी उत्तम कार्यसंस्कृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या सुविधा उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती विजयकुमार पाटील यांनी तरुण वकिलांना उद्देशून प्रामाणिकपणे न्याय देण्याचा सल्ला दिला. त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या समूदाय भवनाचे कौतुक करत, त्याचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. किवडसण्णवर, यल्लप्पा दिवटे, अभियंता एस.एस. सोबरद, न्यायाधीश हेमा लेखा यांच्यासह न्यायालयीन अधिकारी, बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील, मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.