Wednesday, April 23, 2025

/

आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेत अमन रफिक शेख ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भारत सरकारच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा खात्याच्या मान्यतेने केरळ येथील श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठातर्फे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा किताब धारवाड विद्यापीठाच्या अमन रफिक शेख याने हस्तगत केला आहे.

भारतीय शरीर सौष्ठव महासंघाच्या नियमानुसार सदर स्पर्धा विविध आठ वजनी गटात नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते) पुढील प्रमाणे आहे. 60 किलो वजनी गट : मगुम प्रतीक मधुकर (शिवाजी विद्यापीठ), इरफान एम. के. (महात्मा गांधी विद्यापीठ),

श्याम देव एमएस (इनापोया विद्यापीठ), विशाल आर. निलजकर (राणी चन्नम्मा विद्यापीठ), मगम दिनेश (के. एल. विद्यापीठ). 65 किलो गट : अतुल व्ही. ए.स (केरळ विद्यापीठ), बोराडे पंढरीनाथ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), मोहम्मद मुजमील (ओस्मानिया विद्यापीठ),

एस. संजय (पीरियार विद्यापीठ), मोहम्मद निषाद सी. (कालिकत विद्यापीठ). 70 किलो गट : भगाडे गणेश नारायण (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), पीएच अरुण मिताई (मणिपूर विद्यापीठ), मोहम्मद आशिक एस. (ॲना विद्यापीठ), एस शिवप्रियान (भारतीहार विद्यापीठ कोईमतुर), मनीषाराम (जीप्पीआर विद्यापीठ). 75 किलो गट : ओमकार तानाजी पडलकर (संजय घोडावत विद्यापीठ), नियास सीके (कालिकत विद्यापीठ), सत्यर्थ (व्हीबीएस पूर्वांचल विद्यापीठ), टीएच यासना मितेई (मणिपूर विद्यापीठ), श्रीनिधी एजे (हासन विद्यापीठ). 80 किलो गट : एल नाॅगथंग सिंग (मणिपूर विद्यापीठ), डी मथन कृष्णन (मद्रास विद्यापीठ),

ईशान अली (एलटीएस विद्यापीठ), मोहम्मद शहाल पी. (कालिकत विद्यापीठ), ऋतिक राजू जाधव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). 85 किलो गट : अमन रफिक शेख (धारवाड विद्यापीठ), सरफराज खान (एमजीएस विद्यापीठ), मोहम्मद मुर्शिद (कालिकत विद्यापीठ), बॉबी रमेश शाहू (एसजीबीए विद्यापीठ), तिवारी सुरज रमेश (व्हीएनएसजीयु). 90 किलो वजनी गट : किशन (मंगळूर विद्यापीठ), मोहम्मद फैजल एम (कालिकत विद्यापीठ), मोहम्मद शकीब लियाकतअली डोंगरखी (राणी चन्नम्मा विद्यापीठ),Body b

बोस गणेश माणिक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), जॉन जे (ॲना विद्यापीठ). 90 किलो वरील वजनी गट : शनिफ टिके (कालिकात विद्यापीठ), आशिष (एलटीएस विद्यापीठ), शहाबाद अली खान (एमजेपीआर विद्यापीठ), अरुण कुमार एसी (केरळ विद्यापीठ), लकी ओला (सीटी विद्यापीठ).

सदर स्पर्धेत कालिकत विद्यापीठाने सर्वाधिक 61 गुण संपादन करून सांघिक विजेतेपद मिळविले. या विद्यापीठाच्या खालोखाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (40 गुण) आणि मणिपूर विद्यापीठ (35 गुण) यांचा क्रमांक लागतो. स्पर्धेतील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब धारवाड विद्यापीठाच्या अमन रफिक शेख याने हस्तगत केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.