बेळगाव लाईव्ह : सुवर्णसौध कडून दुचाकीवरून रस्ता ओलांडतेवेळी बस आणि दुचाकी च्या मध्ये झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
बुधवारी दुपारी एक वाजता च्या दरम्यान झालेल्या अपघातात जागीच ठार झाला तर दुचाकीच्या मागे बसलेला एक जण फरार झाला आहे.
महादेव यल्लाप्पा गरुडी वय 45 रा. तूम्मुरगुद्दी बेळगाव असे या घटनेत ठार झालेल्या दुचाकी स्वार इसमाचे नाव आहे.
घटनास्थळी हिरे बागेवाडी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार दुचाकी स्वार हायवे ओलांडतेवेळी बेळगावहून धारवाड कडे जाणाऱ्या बसने त्याला ठोकर दिली या घटनेत हा दुचाकी स्वार ठार झाला आहे.
दुचाकीच्या मागे बसलेला एकजण आश्चर्यकारकरीत्या बचावला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.