Wednesday, September 11, 2024

/

नावगे क्रॉस जवळील कारखान्यात भीषण आग

 belgaum

बेळगाव लाईव्ह : नावगे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल या प्लास्टिक टेप बनवणाऱ्या मोठ्या कारखान्यात भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रात्री 8: 30 च्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिसांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग इतकी भीषण होती की रात्री 12 वाजे पर्यंत कारखान्याला पेट घेत होती. अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

या घटनेत किती जीवितहानी झाली याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही मात्र आग लागली त्यावेळी अनेक जण कामगार  रात्र पाळीवर कामाला होते अशीही माहिती मिळत आहे. Fire

घटनास्थळी रात्री उशीर पर्यंत पोलिस आयुक्त मार्टिन, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पी स्नेहा सर्वजण थांबून होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन बोलताना म्हणाले की, या ठिकाणी आम्ही आग विझवण्यासाठी आलो आहोत अनेक कामगार अडकल्याची शक्यता आहे मात्र नेमके किती नुकसान झाले,  कोटी जण अडकलेत जीवित हानी झाली आहे की नाही आगीचे कारण आताच सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत जखमी असलेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Fire

रात्री पासून कारखान्या बाहेर मोठ्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली होती सुरुवातीला अग्निशामक दलाने पोचण्यास उशीर केल्याने आगीचा भडका उडाला असा आरोप घटनास्थळी उपस्थित लोक करत होते.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.