Sunday, June 16, 2024

/

या’ रॉंग साईड वाहतुकीकडे रहदारी पोलीस लक्ष देतील का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह:जुन्या पी. बी. रोड वरील उप्पार गल्ली ते शहापूर पिंपळकट्टा दरम्यान रॉंग साईडने उलट्या दिशेने मालवाहू वाहने हाकण्याचा जीवघेणा प्रकार सुरू असून रहदारी पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

जुन्या पी. बी. रोड वरील उप्पार गल्ली ते शहापूर पिंपळकट्टा दरम्यान रस्त्या शेजारी स्टील पत्रे व सिमेंटची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये माल उतरवण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या मालवाहू वाहनांपैकी कांही वाहने सरळ जाण्याऐवजी उलट्या दिशेने येत असतात. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत.

काल सायंकाळी पाचच्या सुमारास असेच एक मालवाहू वाहन रॉंग साईडने आल्यामुळे आपल्या मुलासमवेत स्कूटर वरून जाणारी एक महिला त्या वाहनावर आदळली.Wrong side driving

 belgaum

पिंपळकटाकडून जुन्या बेळगावच्या दिशेने मुलाला स्कूटर वर पाठीमागे बसवून घेऊन जाणाऱ्या या महिलेला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचा अंदाज आला नाही परिणामी तिची स्कूटर त्या वाहनावर जाऊन धडकली या अपघातात स्कूटर वर मागे असलेल्या मुलाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.Samarth

या पद्धतीच्या अपघाताच्या घटना सदर ठिकाणी सातत्याने घडत आहेत तरी एखादा गंभीर अपघात घडण्यापूर्वी राहणारी पोलिसांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी.

उप्पार गल्ली ते शहापूर पिंपळकट्टा दरम्यान रॉंग साईडने होणाऱ्या वाहतुकीला आळा घालावा, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य वाहन चालक आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.