Sunday, December 22, 2024

/

तिसरे रेल्वे गेट येथील ‘या’ वाहतूक कोंडीकडे लक्ष देण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :तिसऱ्या रेल्वे गेट येथील डी मार्ट समोरील उड्डाण पुला शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

तिसऱ्या रेल्वे गेट येथे अनगोळ नाका अथवा काँग्रेस रोड येथून बेळगाव -खानापूर दुपदरी मार्गाच्या पलीकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाखालून जाणारा सर्व्हिस रोड वाहन चालकांसाठी वेळ वाचवणारा सोयीचा ठरतो.Traffic jam third gate

तथापि डी मार्टसह उद्यमबागच्या दिशेने एकेरी वाहतुक असलेल्या या रोडवर ट्रक अथवा बस सारखे मोठे वाहन जाऊ लागल्यास अथवा विरुद्ध दिशेने एखादे चार चाकी वाहन

आल्यास वाहतुकीची कोंडी होऊन वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तेंव्हा रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देऊन या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.