Tuesday, April 30, 2024

/

मोठ्या दिमतीच्या उमेदवारांनाही समिती उमेदवाराची धास्ती!

 belgaum

बेळगाव लाईव्ह  : गेल्या ६७ वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी न्याय्य आणि लोकशाही पद्धतीने लढा देत, प्रदीर्घ काळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणारा भाग म्हणजे ८६५ गावांचा समावेश असणारा बेळगाव सीमाभाग! सीमाप्रश्नी महाराष्ट्राची भूमिका, केंद्रात भिजत पडलेले सीमाप्रश्नाचें घोंगडे यामध्ये गुदमरून जाणारा येथील मराठी भाषिक..

या भागात राजकारण, पद, सत्ता यासाठी नाही तर केवळ आणि केवळ आपल्या हक्कासाठी आणि या भागावर असलेले आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडतो आहे. आजवर राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज राजकारणी निवडणूक रिंगणात उतरले. मात्र या उमेदवारांना आणि राष्ट्रीय पक्षांना केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचीच धास्ती लागली, हे आजवर सिद्ध झाले आहे.

विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा, अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील मराठी भाषिकांचे एकसंघ राहणे हे राष्ट्रीय पक्षांसाठी धोकादायक ठरत आले आहे. यासाठी ‘डिव्हाइड अँड रुल पॉलिसी’ राबवत राष्ट्रीय पक्षांनी जाहिरातबाजी, प्रलोभने, आमिषे अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मतदारांना, कार्यकर्त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला.

 belgaum

परंतु आजही अनेक समितीनिष्ठ मतदार, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक तन-मन-धनाने समितीसाठी तळमळीने कार्य करत आहेत. अशाच निष्ठावंत कार्यकर्त्याची समितीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवड केली आहे.Mes logo

५१ वर्षांपासून समितीच्या प्रत्येक आंदोलनात स्वाभिमानाने सक्रिय असणारे सर्वसामान्य कार्यकर्ते महादेव पाटील यांना समितीने उमेदवारी जाहीर केली असून राष्ट्रीय पक्षांच्या विचित्र राजकारणात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत समिती उमेदवाराला अधिकाधिक मते मिळतील अशी दाट शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी माणसावर जाणीवपूर्वक केले जाणारे अन्याय, अत्याचार, मराठीची गळचेपी, मराठी भाषेतून परिपत्रके आणि महत्वाचे म्हणजे बहुसंख्य मराठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा कुटील डाव.. या सर्व मुद्द्यांवरून समिती निवडणूक रिंगणात उतरली आहे. ज्या

वेळी निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळी राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकलेली असते. आणि त्या परिस्थितीत हे सर्व राष्ट्रीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते काहीशा गोंधळात सापडलेले दिसत आहेत. राष्ट्रीय पक्षाकडे साधने आहेत. पैसा आणि यंत्रणा आहे तरीही समितीचा एकसंघ कार्यकर्ता हि समितीची संपत्ती आहे आणि या जीवावर समिती पुन्हा एकदा चमत्कार घडवून दाखवेल यात शंकाच नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.