Thursday, May 23, 2024

/

निवडणूक खर्चावर लक्ष ठेवा -डीसी नितेश पाटील

 belgaum

बेळगाव लाईव्ह :निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचीनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणूक जमा-खर्चावर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शनिवारी आयोजित बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील निवडणूक खर्च निरीक्षक, सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

नुकतीच सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक खर्च मर्यादेसह आवश्यक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही संशयास्पद पैशाचा व्यवहार आढळून आल्यास माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. डिजिटलसह प्रत्येक बँकिंग व्यवहारावर कडक नजर ठेवण्यात आली आहे.

 belgaum

त्याचप्रमाणे प्रिंटिंग प्रेस मालकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी बैठकीत सांगितले.

प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये किमान तीन एफएसटी पथके या पद्धतीने एकूण 28 पथके आणि 25 व्हीएसटी पथके कार्यान्वित केली गेली आहेत. अवैध पैसा, दारू भेट वस्तूंचे वाटप यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी वाणिज्य, अबकारी आणि पोलीस खात्याचे अधिकारी एकमेकांच्या समन्वयाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या साथीने सतर्कपणे काम करत आहेत, असेही नितेश पाटील यांनी सांगितले.Dc meeting

बैठकीत बोलताना बेळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक हरक्रीपाल खटाना यांनी आपण काही चेकपोस्टना भेट देऊन पाहणी केली आहे. ज्या ठिकाणी वाहनांची जास्त रहदारी आहे, त्या ठिकाणी ज्यादा कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच ‘पेड न्यूज’ अर्थात पैसे देऊन निवडणुकीच्या बातम्या छापून अन्यायाच्या प्रकारासह प्रत्येक खर्चावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशी सूचनाही खटाना यांनी केली.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विचारणा करण्यात आलेली माहिती बैठकीत दिली. बैठकीस अन्य एक निवडणूक निरीक्षक नरसिंग राव बी., पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रशिक्षक नोडल अधिकारी शंकरानंद बनशंकरी, सहाय्यक निवडणूक अधिकारी पी. एन. लोकेश, सतीश कुमार, प्रभावती फक्कीरपूर, डॉ. राजीव कुलेर, राजश्री जैनापुर, खर्च निरीक्षक नोडल अधिकारी गौरीशंकर कडेचुर, एपीएमसी नोडल अधिकारी गुरुनाथ कडबुर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.