Monday, April 29, 2024

/

भर बाजारपेठेत चोरट्याने केली मोटरसायकल लंपास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील चित्रा -हंस टॉकीज रोडवरील मंगलदीप शोरूम समोर रस्त्यावर पार्क केलेली मोटरसायकल चोरट्याने शिताफिने लंपास केल्याची घटना काल सोमवारी घडली. चोराची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून भर वर्दळीच्या ठिकाणी घडलेला हा चोरीचा प्रकार चर्चेचा विषय झाला आहे.

सदर चोरीची घटना काल सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चोरीला गेलेली मोटरसायकल कलमेश्वर रोड, देवांगनगर 4था क्रॉस, वडगाव येथील युवराज नागप्‍पा भंडारी यांच्या मालकीची आहे.

युवराज हा हंस टॉकीज रोडवरील एका दुकानात कामाला असून काल नेहमीप्रमाणे मंगलदीप शोरूम समोर रस्त्यावर दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी आपली मोटरसायकल पार्क करून तो कामाला गेला होता. त्यानंतर सायंकाळी काम संपवून घरी जाण्याच्या तयारीत असताना आपली मोटरसायकल चोरीस गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले.Cctv footage

 belgaum

सदर चोरीची घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू असताना चोरट्याने प्रथम मोटरसायकलवर बसून आपल्याकडील बनावट चावीने तिचे हॅण्डल लॉक काढले. त्यानंतर आपल्याच मालकीची असल्याच्या अविर्भावात मोटरसायकल घेऊन निघून गेल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटरसायकल चोरीच्या या प्रकारासह चोरट्याची छबी देखील स्पष्टपणे कैद झाली आहे.

याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. भरबाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी घडलेला हा चोरीचा प्रकार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.