Saturday, July 27, 2024

/

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा प्रामाणिकपणा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : किल्ला तलावाजवळ हरवलेला मोबाईल मूळ मालकाला परत देत फेसबुक फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणा जपला आहे.

बेळगाव येथील किल्ला तलावाजवळ फ्लॉवर मार्केट मध्ये फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर आणि दिनेश कोल्हापूरे यांना विवो ब्रँड चा मोबाईल सापडला.

लागलीच त्या दोघांनी सदर मोबाईल मार्केट पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल भद्रशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला सदर मोबाईल स्क्रीन लॉक असल्याने मूळ मालकाचा फोन येईपर्यंत वाट पहावी लागली.Darekar

अखेर मोबाईल हरवलेल्या शहाबाज हुलगुर यांनी पोलीस स्थानकाला संपर्क साधला असता हेड कॉन्स्टेबल भद्रशेट्टी यांनी शाहबाज यांना मोबाईल सुपूर्द केला. कमी किमतीचा मोबाईल असला तरी मूळ मालकापर्यंत परत देण्यास काम दरेकर आणि सहकाऱ्यांनी केले आहे.

फ्लॉवर मार्केटमध्ये मिळालेला मोबाईल मूळ मालकापर्यंत पोहोचून प्रामाणिक कार्य केल्याबद्दल फेसबुक फ्रेंड सर्कलचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.