Friday, May 24, 2024

/

एस. आर. एस. हिंदुस्थान संघ ठरला वरदराज चषकाचा मानकरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दोस्ती ग्रुप भवानीनगर आयोजित वरदराज ट्रॉफी सीजन थ्री क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीराम सेना हिंदुस्तान संघाने शौर्य स्पोर्ट्स संघाचा पराभव करत वरदराज चषकावर आपले नाव कोरले आहे.

गेल्या तीन वर्षापासून बेळगाव येथील भवानीनगर येथील दोस्ती ग्रुप यांच्यावतीने वरदराज ट्रॉफी श्री गणेश ट्रॉफी चे आयोजन करण्यात येते. अंतिम सामन्यात श्रीराम सेना हिंदुस्तान संघाने शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर संघाचा पराभव करत प्रथम पारितोषिक ५१,०००/- रुपये ट्रॉफी मिळवली तर उपविजेत्या संघशौर्य स्पोर्ट्स कपिलेश्वर द्वितीय पारितोषिक २५,०००/- रुपये मिळवत समाधान मानावे लागले.

प्रथम फलंदाजी करत असताना एस. आर. एस हिंदुस्थान संघाने निर्धारित ६ षटकांमध्ये ३ गडी बाद ४९ धावा केल्या प्रत्त्युत्तर दाखल धावांचा पाठलाग करत असताना
शौर्य स्पोर्ट्स संघाने ६ षटकांमध्ये ७ गडी मोबदल्यात ४४ धावा करता आल्या अत्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यात एसआरएस संघाने ५ धावाच्या फरकानी विजय मिळवला.Varadaraj trophy

 belgaum

एस. आर. एस. हिंदुस्थान संघाचा वसंत शहापूरकर
सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला तर
मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज देखील एस. आर. एस. हिंदुस्थान संघाचा शिवराज हिरोजी याला गौरविण्यात आले .मालिकावीर म्हणून वसंत शहापूरकर(एस आर एस)उत्कृष्ट फलंदाज म्हणून अझर अश्रफी ( शौर्य स्पोर्ट्स) याची निवड करण्यात आली.

वरदराज केबल नेटवर्क चे राजेश जाधव, आकाश पाटील, सारंग राघोचे, संपत राघोजी, प्रथमेश कावळे, उमेश, गणेश बस्तवाडकर यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले

श्री राम सेना हिंदुस्थान या संघाचे नेतृत्व उमेश बाळू कुऱ्याळकर तर शौर्य स्पोर्ट्स या संघाचे नेतृत्व मोशीन खान यांनी केले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.