बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या खासबाग येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो, या बाजारात विविध पालेभाज्या, कडधाने व विविध प्रकारच्या वस्तू मिळतात त्यामुळे येथे येणारा ग्राहकवर्ग हा सर्वसामान्य ते उचभ्रू वर्गातील ही असतो,
म्हणून पंचक्रोशीतील प्रत्येकाला या आठवडी बाजारात येऊन आपल्या घरचा आठवड्याचा बाजार करणे नित्याचेच ठरलेले असते पण हा बाजार भलत्याच कारणाने प्रसिद्धही आहे, येथे येणारे किरकोळ व्यापारी आपली दुकाने थाटताना जागेवरून भांडायचे नित्याचेच बनलेले आहे,
हे भांडण करतांना ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात, विक्रीच्या जागेवरून काही महिला भाजी विक्रेत्या तर भांडताना एकमेकांचे केस उपटतानाही मागेपुढे पहात नाहीत, यामुळे त्यांचे हसे होते तर बघ्यांची करमणूक होते, काही व्यापारी तर ग्राहकांच्या सोबत व्यवहार करताना किमतीवरून भांडत असतात,
विक्री होणाऱ्या मालाचा दर ठरला नाही यावरूनही विक्रेते ग्राहकांवर अरेरावीची भाषा करतांना दिसतात,त्यामुळे ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे, येथे येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीला जाणे हे तर नित्याचेच बनलेले आहे,
या मोबाईल चोरीच्या तक्रारीही अनेकवेळा झालेल्या आहेत,यामुळेही नागरिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, यापूर्वी शेतकऱ्याच्या थेट शेतातुन येथे भाजीपाला विक्रीला यायचा अशी या बाजाराची ख्याती होती,
पण मूळ शेतकऱ्याचा माल घाऊक व्यापाऱ्याकरवी किरकोळ विक्रेत्याकडे येऊन येथे विकला जातोय अशी सद्याची परिस्थिती आहे, त्यामुळे पीक पिकवणाऱ्या शेतकाऱ्याचेही यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.
यासर्व घडामोडीमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने यावर संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.