Thursday, December 5, 2024

/

यात्रेहून परतणाऱ्याचा अपघातात मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर करंबळ आणि बेकवाड येथील यात्रा आटोपल्यानंतर रूमेवाडीतील आपल्या बहिणीची भेट देऊन घरी परतणाऱ्या इसमाचा अपघातात मृत्यू झाला.

नारायण भगवंत पाटील (वय 47, राहणार : माडीगूंजी ता. खानापूर ) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबत नंदगड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, माडीगुंजी (ता. खानापूर) येथील रहिवासी नारायण भगवंत पाटील (47) हे करंबळ यात्रेनिमित्त रूमेवाडी येथील आपल्या बहिणीच्या घरी सहपरिवार आले होते.Accident death

करंबळ येथील यात्रा आटोपून ते सहपरिवार बेकवाडच्या यात्रेला गेले. लक्ष्मीचे दर्शन घेऊन परत रूमेवाडीला आपल्या बहिणीच्या घरी आले. त्यानंतर ते त्यांच्या काही नातेवाईकांना आणण्यासाठी आपली ओमनी व्हॅन घेऊन बेकवाडकडे जात असताना हा अपघात झाला.

बिडीहून खानापूरकडे येत असलेल्या खानापूर-बिडी – खानापूर, या शटल बसची आणि व्हॅनची महात्मा गांधी हायस्कूलजवळ समोरासमोर धडक बसली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगा आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.